शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ - ३० सप्टेंबर २०१८

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ - ३० सप्टेंबर २०१८

* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्व चॅम्पियन भारोत्तोलक मीराबाई चानू यांना  प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान केला. तर भालाफेकपटू नीरज चोपडासह २० खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.

* राष्ट्रपती भवनातील अशोका सभागृहात आयोजित कार्यक्रमात सर्वांची नजर कोहलीवर केंद्रित झाली होती. विराट हा सचिन तेंडुलकर १९९७-९८ आणि महेंद्रसिंग धोनी २००७ यांच्यानंतर खेलरत्न पुरस्काराचा मानकरी ठरलेला क्रिकेटपटू आहे.

* राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार - विराट कोहली, मीराबाई चानू

* अर्जुन पुरस्कार - नीरज चोप्रा, जीन्सन जॉन्सन, आणि हिमा दास, ऍथलेटिक्स, एन सिक्की रेड्डी बॅडमिंटन पटू, सतीश कुमार बॉक्सिंग, स्मृती मंदाना क्रिकेट, शुभंकर शर्मा गोल्फ, मनप्रीत सिंग, सविता हॉकी, रवी राठोड पोलो, राही सरनोबत, अंकुर मित्तल, श्रेयसी सिंग नेमबाजी, मणिका बत्रा, जी साथियन टेबल टेनिस, रोहन बोपन्ना टेनिस, सुमित कुस्ती, पूजा काडीया वशु, अंकुर धामा पॅरा ऍथलेटिक्स, मनोज सरकार पॅरा बॅडमिंटन.

* द्रोणाचार्य पुरस्कार - सी ए कुट्टूपा बॉक्सिंग, विजय शर्मा भारत्तोलन, ए. श्रीनिवासन राव टेटे, सुखदेव सिंग पन्नू ऍथलेटिक्स, क्लेरेन्स लोबो हॉकी आजीवन, तारक सिन्हा क्रिकेट आजीवन, जीवन कुमार शर्मा ज्युडो आजीवन, व्ही आर बिडू ऍथलेटिक्स आजीवन.

* ध्यानचंद पुरस्कार - सत्यदेव प्रसाद तिरंदाजी, भरत कुमार छेत्री हॉकी, बॉबी अलॉयसीयस ऍथलेटिक्स, चौगुले दादू दत्तात्रेय कुस्ती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.