सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २४ सप्टेंबर २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २४ सप्टेंबर २०१८

* बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने चितगाव आणि मोंगला ही बंदरे भारत सरकारला वापरासाठी खुली करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

* सायबर सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने सायबर विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्शवभूमीवर सेंटर ऑफ एक्सलन्स सायबर सिक्युरिटी या नावाचे देशातील पहिले केंद्र शिवाजी विद्यापीठात कोल्हापूर १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. 

* जागतिक ओझोन दिनी केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी मोन्ट्रीयल प्रोटोकॉल इंडियाज सक्सेस स्टोरी आणि भारताच्या कुलिंग ऍक्शन प्लॅनच्या मसुद्याचे अनावरण केले. 

* दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे १६ ते १९ सप्टेंबरदरम्यान ७ व्या यूएनडब्लूटीओ वैश्विक शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचा विषय होता [ए २०३० व्हिजन फॉर अर्बन टुरिझम] हा होता. 

* अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या दहशतवाद विरोधी विभागाने गेल्या वर्षी जगभरात झालेल्या दहशतवादी कारवायासंदर्भात अहवाल तयार केला आहे. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. 

* पंतप्रधानाच्या नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील द्वारका येथे भारत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटरची आयआयसीसी याची पायाभरणी केली. 

* ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विद्याधर विष्णू अर्थात वि वि चिपळूणकर यांचे १८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. 

* भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरचे बीएआरसी संचालक कमलेश नीलकंठ व्यास यांची अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. ते विद्यमान प्रमुख शेखर बसू यांची जागा घेतील. 

* हिंदीचे प्रतिष्ठित लेखक, पत्रकार, निवेदक, ज्येष्ठ कवी आणि हिंदी अकादमीचे उपाध्यक्ष विष्णू खरे यांचे १९ सप्टेंबर रोजी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.  

* एखाद्या क्षेत्रातील संशोधनाच्या किंवा वस्तू वापराबाबतचे स्वामित्व हक्क पेटंट मिळवण्यासाठी देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. 

* रिझर्व्ह बँकेच्या धोरणांना संशोधनाची जोड देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देण्यात मोलाचा वाटा असलेले अर्थतज्ञ दीना खटखटे यांचे अमेरिकत वॉशिंग्टन येथे निधन झाले. 

* ओझोन थराच्या संरक्षणासाठी १६ सप्टेंबर १९८७ रोजी कॅनडातील मोन्ट्रीएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या.

* भारताने २३ सप्टेंबर रोजी ओरिसातील बालासोर येथील अब्दुल कलाम बेटावरून पूर्वीचे व्हीलर बेट इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय नियुक्ती समितीने अनिल कुमार चौधरी यांची स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे [SAIL] नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

* भारत आणि जर्मनीने कार्यक्षम विकासासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे भारतीय तरुणांना व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण मिळेल.

* भारत सरकारने अन्न व कृषी संघटनेसोबत मिळून हरित कृषी प्रकल्प [ग्रीन ऍग्रीकल्चर प्रोजेक्ट सुरु केला. कृषी क्षेत्रातील जैव विविधता आणि वन संरक्षणाद्वारे कृषी क्षेत्रात परिवर्तन आणणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात दरवर्षी २.६ लाख जणांना मृत्यू होतो.

* दोहा येथे सुरु असलेल्या आशियाई सांघिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

* घातक स्वरूपाची बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने २०१७ मध्ये केलेल्या प्रयत्नांची अमेरिकेने प्रशंसा केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.