रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन - १६ सप्टेंबर २०१८

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन - १६ सप्टेंबर २०१८

* हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्याच्या जोशी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

* शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशी निर्माण केली होती.

* देशभरातील मल्ल इथे कुस्तीसाठी येत होते. त्यामुळे जवळच्याच पुनवत गावातील गणपतराव आंदळकर यांनीही कोल्हापुरात येणे स्वाभाविक होते.

* दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर हे त्याना वस्ताद म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती करू लागले. त्याचमुळे कोल्हापूरच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज ट्रस्टचा शाहू पुरस्कार जाहीर झाला.

* १९६४ साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. आंदळकरांच्या उमेदीचा काळ हे कुस्तीचे सुवर्णयुग होते. कुस्तीला प्रतिष्ठा होती आणि मल्लाना ग्लॅमर होते. आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्तीत यश मिळविले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.