गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

क्रीडा पुरस्कार २०१८ जाहीर - २१ सप्टेंबर २०१८

क्रीडा पुरस्कार २०१८ जाहीर - २१ सप्टेंबर २०१८

* नेमबाज राही सरनोबत आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना या महाराष्ट्राच्या खेळाडूंना यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. 

* त्याचवेळी भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि महिला भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

* काही दिवसापूर्वी या पुरस्कारासाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. 

* या वर्षीच्या विविध क्रीडा पुरस्काराची गुरुवारी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात २५ सप्टेंबरला होणाऱ्या विशेष समारंभात सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

* साडेसात लाख रुपये रोख, आणि प्रमाणपत्र असे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे स्वरूप असणार आहेत. त्याचप्रमाणे अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये व प्रमाणपत्र देण्यात येईल. 

* राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र, तर आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद चषक १० लाख रुपये रोख प्रशस्तिपत्रक मिळणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.