गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

दादू चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर - २१ सप्टेंबर २०१८

दादू चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर - २१ सप्टेंबर २०१८

* रुस्तम ए हिंद, महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार कुस्तीतील योगदानाबद्दल कोल्हापूरला प्रथमच स्थान मिळत आहे. या सन्मानाने या क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

* मूळचे अर्जुनवाडा येथील असलेले दादू चौगुले हे कुस्तीनिमित्त वयाच्या सातव्या वर्षी कोल्हापुरातील मोतीबाग तालिममध्ये गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झाले.

* कुस्ती क्षेत्रात दादूमामा या नावाने प्रसिद्ध असलेले दादू चौगुले यांनी प्रथमच न्यूझीलंड येथील ख्राईस्ट चर्च येथे झालेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत महाराष्ट्र केसरी 'किताब पटकाविला.

* १९७३ साली मुंबई येथे राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेत सुपर हेवी गटात रुस्तम ए हिंद हा मानाचा 'किताब पटकाविल्यानंतर त्याचवर्षी नवी दिल्ली येथे त्यांनी सुपर हेवी गटात भारत केसरी 'किताब पटकाविला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.