सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

मालदीवचे अध्यक्ष यामीन निवडणुकीत पराभूत - २५ सप्टेंबर २०१८

मालदीवचे अध्यक्ष यामीन निवडणुकीत पराभूत - २५ सप्टेंबर २०१८

* मालदीवमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये अध्यक्ष अब्दुल्ला यामीन याना पराभूत करत विरोधीपक्षाचे उमेदवार इब्राहिम महंमद सोलीह यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे.

* भारत आणि श्रीलंकेने सोलीह यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. सोलीह यांना ५८.३३ टक्के मते मिळाली तर यामीन यांना ४१.७ टक्के मते मिळाली.

* यामीन यांनी मात्र अद्याप आपल्या पराभवाबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही. मालदीवमधील चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी भारत उत्सुक आहे. त्यामुळे भारताने सोलीह यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.