गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

सर्वोच्च तंत्रज्ञान भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा - ७ सप्टेंबर २०१८

सर्वोच्च तंत्रज्ञान भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा - ७ सप्टेंबर २०१८

* भारत आणि अमेरिकेत गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांनी संरक्षनाशी संबंधित सीओएमसीएएस करारावर स्वाक्षऱ्या केल्या.  

* या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रे विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका आणि भारतामध्ये आज टू प्लस टू ची बैठक पार पडली आहे. यापूर्वी ती बैठक दोनवेळा रद्द झाली.

* अमेरिकेकडून संरक्षण मंत्री जिम मॅटीस परराष्ट्रमंत्री माईक पॉमियो तर भारताकडून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या बैठकीत सहभागी झाले होते.

* दोन्ही देशांचे लष्करी संबंध दृढ करणे आणि आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याचा या करारामागे उद्देश आहे. दक्षिण आशियात स्थिरता आणि शांतता कशी नांदेल त्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.