शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना - ८ सप्टेंबर २०१८

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना - ८ सप्टेंबर २०१८

* राज्य शासनाने अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनांची सुविधा निर्माण करून उत्पन्नात वाढ करण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तयार केली आहे.

* आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील जिल्ह्यासह आदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील अशा एकोणतीस जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

* या दोन्ही योजनांमध्ये पात्र शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी २ लाख ५० हजार, विंधन विहिरीसाठी २० हजार, कृषीपंप संचासाठी २० हजार, वीज जोडणीसाठी आकार १० हजार, शेततळ्याचा प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख. ठिबक सिंचनासाठी ५० हजार, तुषार सिंचनासाठी २० हजार, पीव्हीसी पाईपसाठी ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

* जातीचा वैध दाखला, आधार कार्ड, सातबारा ८ अ चा उतारा तसेच १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे अर्जासोबत जोडने आवश्यक आहे. ०.२० हेक्टर ते ६ हेक्टरपर्यंत जमीनधारणा असणे आवश्यक केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.