शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांचे निधन - २८ सप्टेंबर २०१८

ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांचे निधन - २८ सप्टेंबर २०१८

* ब्र, भिन्न अशा प्रसिद्ध कादंबऱ्यांतून मराठी साहित्य विश्वात वेगळा ठसा उमटवणाऱ्या बंडखोर लेखिका संवेदनशील कवयित्री कविता महाजन ५१ यांचे गुरुवारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

*  त्यांचा जन्म नांदेड येथे ५ सप्टेंबर १९६७ रोजी झाला. महाजन यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले.

* नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात व औरंगाबादच्या शासकीय कला विद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयावर एम ए पदवी संपादन केली होती.

* आपल्या लेखनातून त्यांनी कायम वेगळी वाट चोखळली. त्यांच्यावर काही प्रमाणात टीकाही झाली. मात्र त्यांनी कायम स्त्रीमनाचा हुंकार मांडण्याचा प्रयत्न केला.

* त्यांच्या कुहू, रजाई, जोयानाचे रंग या त्यांच्या कादंबऱ्या बरीच गाजल्या. साहित्य अकादमी पुरस्कार तसेच नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स अवॉर्डनी त्यांचा गौरव केला.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.