गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

राष्ट्रीय डिजिटल दूरसंचार धोरणाला मंजुरी - २७ सप्टेंबर २०१८

राष्ट्रीय डिजिटल दूरसंचार धोरणाला मंजुरी - २७ सप्टेंबर २०१८

* केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्या दूरसंचार धोरणाला मंजुरी दिली असून 'राष्ट्रीय डिजिटल दूरसंचार धोरण असे याचे नवे नाव आहे. या धोरणांतर्गत या क्षेत्रातील गुंतवणूक १० हजार कोटी डॉलरपर्यंत वाढवण्याचा सारखाच उद्देश आहे.

* या क्षेत्रात केंद्राने ठरविल्याप्रमाणे गुंतवणूक झाली की नाही या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. असा दावा केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिंह यांनी केला.

* ते म्हणाले की २०२२ पर्यंत देशात किमान ४० लाख नवे रोजगार या क्षेत्राद्वारे निर्माण होतील. गेल्या तीन वर्षात दूरसंचार क्षेत्रातील परकीय गुंतवणूक ५% वाढून ६.२ अब्ज डॉलर एवढी झाली.

* नव्या दूरसंचार धोरणाचा मसुदा भविष्यातील तंत्रज्ञानाचे स्वरूप लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. येत्या दोन दशकांत भारत जगातील ३ री मोठी अर्थव्यवस्था होणार आहे.

* त्यामुळे जगभरातून भारतात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. विलीनीकरण अधिग्रहण व काही व्यवसाय बंद झाल्याने गेल्या दोन तीन वर्षात या क्षेत्रात अनेक चढ उतार झाले आहेत.

* केंद्र सरकार येत्या दोन वर्षात म्हणजे २०२० पर्यंत देशात ५ जी तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परकीय गुंतवणुकीमुळे मशीन टू मशीन कम्युनिकेशन, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशिअल इंटीलिजन्स यासारखी आधुनिक प्रणाली आणण्यास मदत होणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.