रविवार, २ सप्टेंबर, २०१८

थेट परदेशी गुंतवणुकीत मॉरिशस अग्रेसर - ३ सप्टेंबर २०१८

थेट परदेशी गुंतवणुकीत मॉरिशस अग्रेसर - ३ सप्टेंबर २०१८

* भारतात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशामध्ये मॉरिशस अग्रस्थानी आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये एकूण सुमारे २६५२ अब्ज रुपयांनी गुंतवणूक भारतामध्ये केली गेली.

* या आधीच्या आर्थिक वर्षांमध्ये २०१६-१७ मध्ये ही गुंतवणूक २५७८ अब्ज रुपये इतकी होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार मॉरिशसच्या खालोखाल दुसरा क्रमांक सिंगापूरचा लागतो.

* २०१७-१८ मध्ये मॉरिशसने सुमारे ९५२ अब्ज रुपये व सिंगापूरने ६५८ अब्ज रुपये गुंतवणूक केली आहे. या आधी ही रक्कम अनुक्रमे ९४९ व ४६२ एवढी होती. नेदरलँड कडून झालेल्या गुंतवणुकीत काहीशी घट पाहण्यात आली.

* मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये विनिर्माण क्षेत्रात एफडीआयमध्ये घट झाली आहे. ही रक्कम सुमारे ५०१ अब्ज रुपये होती.

* दळणवळण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढली असून २०१७-१८ मध्ये ती ६२४ अब्ज रुपये झाली. अर्थव्यवस्थेत नव्या क्षेत्रामधील गुंतवणुकीबाबत पाहता गुंतवणूकदारांना त्यात रस आहे. यामध्ये ईकॉमर्स वित्तीय तंत्र यांचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.