मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

ग्रामीण भागातील मुलींना आता १२ वी पर्यंत मोफत एसटी प्रवास - २६ सप्टेंबर २०१८

ग्रामीण भागातील मुलींना आता १२ वी पर्यंत मोफत एसटी प्रवास - २६ सप्टेंबर २०१८

* ग्रामीण भागातील मुलींना इयत्ता १२ वी पर्यंत मोफत बस प्रवास सवलत पास देण्यात येणार आहे. तर ६५ वर्षाखालील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठी प्रवास सवलत आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकाराना शिवशाही बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे.

* या निर्णयाचा फायदा २ कोटी १८ लाख लोकांना होणार आहे. राज्यमंत्रीमंडळाने मंगळवारी या संदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती परिवहनमंत्री दिवाकरराव रावते यांनी दिली.

* अहिल्याबाई होळकर योजनेत दहावीपर्यंत मुलींसाठी मोफत बस प्रवास होता. आता १२ वी पर्यंतच्या मुलींना ही सवलत मिळेल. याचा एकूण २४ लाख विद्यार्थिनींना फायदा होईल. या पोटी राज्याच्या तिजोरीवर ४४ कोटीचा भार पडेल.

* १९८६ नंतर सुरु झालेल्या तंत्र व व्यवसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांना सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. ही सवलत ६६.६७% असेल. या योजनेचे ४४ लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत.

* लाभार्थ्यांना आधार कार्ड संलग्न स्मार्ट कार्ड देण्यात येईल. तसेच यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे तीच सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे.

* ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सध्या सर्वसाधारण व निमआराम बसेसमध्ये ५०% सवलत आहे. आता वातानुकूलित शिवशाही बसमध्येही ४५% सवलत मिळते.

* प्रतिवर्षी कमाल ४ हजार किलोमीटर अंतराची मर्यादा असेल. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.