सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

देना, विजया, बडोदा बँकांचे विलीनीकरण - १८ सप्टेंबर २०१८

देना, विजया, बडोदा बँकांचे विलीनीकरण - १८ सप्टेंबर २०१८

* बँकांच्या विलीनीकरणाच्या दिशेने केंद्र सरकारचे आणखी एक पाऊल टाकले आहे. देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचे आता विलीनीकरण करण्यात येणार आहे.

* या विलीनीकरणातून निर्माण होणारी बँक ही देशातील तिसरी सर्वात मोठी बँक असणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

* यात बँकाच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला १० ते १५ दिवसात मंजुरी मिळेल. संपूर्ण प्रक्रिया चालू आर्थिक वर्षाअखेरीस पूर्ण होणार. सरकारी बँकांची संख्या १९ वर येणार, यानंतर ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक अस्तित्वात येणार.

* या बँकाच्या विलीनीकरणानंतर ६.४ लाख कोटी दिलेली कर्जे, ८.४१ लाख कोटी एकूण ठेवी, ८० हजार कोटी थकीत कर्जे एनपीए अस्तित्वात राहील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.