शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

भारताकडून ऑस्करसाठी आसामच्या व्हिलेज रॉकस्टार चित्रपटाची निवड - २३ सप्टेंबर २०१८

भारताकडून ऑस्करसाठी आसामच्या व्हिलेज रॉकस्टार चित्रपटाची निवड - २३ सप्टेंबर २०१८

* पद्मावत, राजी, पिहू, कडवी हवा, आणि न्यूड या चित्रपटांची ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत एंट्री असतानाच रिमा दास दिग्दर्शित व्हिलेज रॉकस्टार या असामी चित्रपटाची निवड झाली आहे.

* या चित्रपटाने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात उत्कृष्ट चित्रपट म्हणून मोहोर उमटविली होती. व्हिलेज रॉकस्टार हा असामी चित्रपट यंदा सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागात भारताचे प्रतिनिधित्व करेल.

* हा चित्रपट ७० हुन अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला आहे.  या चित्रपटाला ४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

* आपल्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्याचे कळताच रिमा दास यांना खूपच आनंद झाला. माझ्यासाठी हा खूपच मोठा सन्मान आहे. निवड झाल्यामुळे मी आज खूप आनंदी आहे. सर्व संबंधितांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. असे त्या म्हणाल्या. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.