शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

पुणे विमानतळ प्रवाशांच्या सेवेसाठी जगात तिसऱ्या क्रमांकावर - १३ सप्टेंबर २०१८

पुणे विमानतळ प्रवाशांच्या सेवेसाठी जगात तिसऱ्या क्रमांकावर - १३ सप्टेंबर २०१८ 

* प्रवासी सुविधांबाबत पुण्याच्या विमानतळाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. एअरपोर्ट कॉन्सिल ऑफ इंटरनॅशनल एसीआय कॅनडा येथे झालेल्या परिषदेत जगभरातील प्रवासी सेवेत सर्वोत्तम असलेल्या विमानाची यादी जाहीर करण्यात आली. 

* त्यात ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असलेल्या विमानतळाच्या गटात पुणे विमानतळाने जगात तिसरे स्थान पटकावले आहे. पुण्यासह कोलकाता विमानतळही तिसऱ्या स्थानावर आहे.  

* एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड्स २०१८ अंतर्गत कोट्यवधी प्रवाशांनी नोंदविलेल्या मतानुसार एसीआय हे रेटिंग गुरुवारी जाहीर केले. या संस्थेत १७६ देशातील १९५३ सभासद आहेत. 

* सर्वेक्षण करताना विमानतळासंबंधी टर्मिनल पासून विमानतळापर्यंत जाण्याचा रस्ता, सुरक्षा विषयक तपासणी, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विश्रांतीगृह, स्टोअर्स, रेस्टोरंस आदी प्रवासी सुविधेच्या विविध ३४ कॅटेगिरीनुसार या विमानतळावर सर्वेक्षण केले जाते. 

* यंदा एसीआयच्या सर्व्हेमध्ये एशिया पॅसिफिक गटातून भारतातील पुणे, लखनो, चेन्नई, कोलकता, अहमदाबाद, आणि इंदोर या सहा विमानतळाचा समावेश होता. 

* देशातील सर्वात व्यग्र मार्गामध्ये पुणे-दिल्ली हवाई मार्ग सहाव्या स्थानी, सर्वाधिक विमान उड्डाणामध्ये पुणे विमानतळ नवव्या स्थानी, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवासी सुविधांमध्ये पुणे विमानतळ तिसऱ्या स्थानी २०१७ होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.