रविवार, २ सप्टेंबर, २०१८

वांगचुक-वाटवानी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान - २ सप्टेंबर २०१८

वांगचुक-वाटवानी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान - २ सप्टेंबर २०१८

* आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने दोन भारतीयांना गौरविण्यात आले. मानसिकरित्या दुर्बल घटकासाठी काम करणारे मुंबईतील मानसोपचार तज्ञ भारत वाटवाणी आणि वांगचूक यांच्यसह एकूण सहा जणांना शनिवारी हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.

* फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे दरवर्षी द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनतर्फे दिला जातो. वाटवानी आणि त्यांच्या पत्नीने मानसिक रुग्णांचे आयुष्य सुधारण्यासाठी १९८८ मध्ये श्रद्धा रिहॅबलिटेशन फाउंडेशनची स्थापना केली  होती.

* याद्वारे रस्त्याच्या शेजारी आयुष्य वेचणाऱ्या मानसिक रुग्णांना वाचविण्याचे काम ते करतात. इतकेच नाही तर त्यांचे मोफत निवास व्यवस्था, भोजन आणि उपचार सुविधा देताना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

* ५१ वर्षीय वांगचुक यांना उत्तर भारतातील शिक्षण प्रणालीतील त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी ओळखले जातात. वाटवानी आणि वांगचुक यांच्याबरोबर कोलंबियाचे युक चांग, पूर्व तिमोरच्या मारिया डी लॉरदीस क्रूझ, फिलिपाईन्सचे हॉवर्ड डी आणि व्हिएतनामचे वो थी होआंग येन यांचा समावेश आहे.

* सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, यासारख्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.