शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

जागतिक वाहन शिखर परिषद २०१८ - ८ सप्टेंबर २०१८

जागतिक वाहन शिखर परिषद २०१८ - ८ सप्टेंबर २०१८

* इलेक्ट्रिक वाहने आणि स्मार्ट चार्जिंग सुविधा यांची निर्मिती करण्यासाठी गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. जागतिक वाहन शिखर परिषद [मूव्ह] दिल्ली येथे बोलत होते.

* मोदीजी म्हणाले स्वच्छ ऊर्जा हे हवामान बदलाविरुद्ध लढण्याचे सर्वात प्रभावशाली शस्त्र आहे. तसेच आपले लक्ष कारच्या पलीकडे जायला हवे. स्कुटर व रिक्षासारख्या वाहनावर लक्ष देण्याची गरज आहे.

* वाहतूक कोंडीमुळे होणारे आर्थिक आणि पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी कोंडीमुक्त वाहन व्यवस्था आवश्यक आहे.

* योग्य वाहन व्यवस्थेमुळे प्रवास आणि वाहतुकीचा ताण कमी होतो. व अर्थव्यवस्थेला चालना मिळते. हे रोजगार देणारे मोठे क्षेत्र आधीपासून आहे. पुढील पिढ्यापासून त्यातुन रोजगार निर्माण होत राहील.

* जगातील वाहन कंपन्यांचे सीईओ या परिषदेला उपस्थित आहेत. त्यांना मोदीजी म्हणाले की इलेकट्रीक वाहनांच्या मूल्य साखळीतील बॅटरी व स्मार्ट चार्जिंग यासारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी गुंतवणूक व्हावी यासाठी सरकार उत्सुक आहे. 

* भविष्यातील भारतीय वाहन क्षेत्रासाठी मी ७ सी चा दृष्टिकोन ठेवला कॉमन, कनेक्टेड, कन्विनियंट, कंजेशन फ्री, कोंडी विरहित, चार्ड्ज, क्लीन आणि कटिंग एज अत्याधुनिक ७ सी आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.