मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

२०२५ पर्यंत जगातील ५२% कामकाज यंत्रमानव करणार - १८ सप्टेंबर २०१८

२०२५ पर्यंत जगातील ५२% कामकाज यंत्रमानव करणार - १८ सप्टेंबर २०१८

* अवघ्या जगभरात बेकारीचे प्रमाण वाढले असताना यंत्रमानव येत्या ७ वर्षात मानवाच्या जवळपास निम्म्या नोकऱ्या फस्त करणार असल्याचा दावा जागतिक आर्थिक मंचाने डब्लूइएफ आपल्या एका अहवालात केला आहे.  

* २०२५ पर्यंत यंत्रमानव मनुष्याला मागे टाकून आजच्या युगातील जवळपास ५२% कामकाज स्वतः सांभाळेल असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

* यंत्रमानवाने मनुष्याच्या हातचे काम हिरावून घेतल्यानंतर मानवाला नवनव्या भूमिकांना शोध घ्यावा लागेल. एवढेच नाही, तर यंत्र व संगणकाच्या कार्यक्रमासोबत काम कसे करावे. 

* किंवा त्यांच्या वेगाशी ताळमेळ कसा बसवावा याचे नवे कौशल्यही मनुष्याला आत्मसात करावे लागेल. असा अंदाज या जागतिक मंचाने व्यक्त केला आहे. 

* सद्यस्थितीत रोबोटच्या माध्यमातून जवळपास २९ टक्के दैनंदिन कामकाज केले जाते. २०२५ पर्यंत रोबोटचे हेच कामकाज ५२ टक्क्यापर्यंत पोहोचेल, असे स्विस संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे. 

* जिनेव्हास्थित असलेल्या डब्लूईएफ ला श्रीमंत राजकारणी व उद्योगपतीच्या वार्षिक परिषदांसाठी ओळखले जाते. याचे आयोजन स्वित्झरलॅंडच्या दावोसमध्ये केले जाते. 

* द फ्युचर जॉब्स २०१८ नामक या अहवालात यंत्रमानव लवकरच लेखा, ग्राहक व्यवस्थापन, औद्योगिक, पोस्टल व सचिवस्तरीय मानवी नोकऱ्या खाऊन टाकेल असा दावा करण्यात आला आहे. 

* ईकॉमर्स व सोशल मीडियासह सेल्स मार्केटिंग व ग्राहक सेवेसारख्या ज्या नोकऱ्यांत मानवी कौशल्याची गरज असेल त्यात मानवी कौशल्यात वृद्धी झाल्याचे दिसून येईल. 

* याशिवाय रचनात्मक, टीकात्मक व प्रबोधनसारख्या कार्यातही  मानवी कौशल्य टिकून राहील. विशेषतः संगणक प्रक्रियेतील समस्या सोडविण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मशिन्स किंवा अल्गोरिदम क्षेत्रात आजच्या ७५ दशलक्षांच्या तुलनेत जवळपास १३३ दशलक्ष नव्या संधी निर्माण होतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.