सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

नवीन चालू घडामोडी - १७ सप्टेंबर २०१७

नवीन चालू घडामोडी - १७ सप्टेंबर २०१७

* पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने सीमेवर अदृश्य इलेकट्रॉनिक भिंत अथवा आभासी कुंपण व्हर्च्युअल फेन्स उभे केले आहे. 

* केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने १४ सप्टेंबर रोजी देशभरात ऊर्जा कार्यक्षम चिलर यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी चिलर स्टार लेबलिंग उपक्रमाला सुरुवात केली. 

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने २०१७-१८ ते २०१९-२० या कालावधीत क्षमता विकास योजना सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. यासाठी २,२५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

* स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत छत्तीसगढमधील १३ स्थानांना जोडणाऱ्या भारताच्या पहिल्या आदिवासी परिक्रमा सर्किट प्रकल्पाची सुरुवात पर्यटन मंत्रालयाने केली. 

* केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांनी नवी दिल्ली येथे दूध प्रक्रिया व पायाभूत सुविधा निधी योजना सुरु केली. यासाठी १०,८८१ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. 

* बांगलादेशमध्ये पार पडलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ सॅफ चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मालदीवने भारतावर २-१ असा विजय मिळवत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 

* हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने समुद्रात पाळत ठेवणाऱ्या भारतातील पहिल्या जहाजाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

* केंद्रीय मंत्रिमंडळाने ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील संशोधनातील डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी एक्झिम बँक आणि ब्रिक्स देशांच्या बँकांमधील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. 

* तामिळनाडू सरकारने ई-सिगारेट आणि इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम यांच्या उत्पादन विक्री आणि जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्याचा आदेश दिला.  

* देशात ४ नवीन नॅशनल डिझाईन इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येणार आहेत. ते अमरावती आंध्रप्रदेश, भोपाळ मध्यप्रदेश, जोरहाट आसाम, कुरुक्षेत्र हरियाना याठिकाणी स्थापन करण्यात येणार आहेत. 

* ड्रग टेक्नॉलॉजी ऍडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने दैनंदीन वापरातील ३२८ औषधांच्या उत्पादन, विक्री किंवा वितरणावर बंदी घातली आहे. 

* केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान या नवीन एकीकृत योजनेला मंजुरी दिली आहे. सरकारच्या शेतकरी कल्याण उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि अन्न दात्यांनी मंजुरी दिली होती. 

* निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडकामधील मतदान पत्रिकेतील नोटांचा पर्याय काढून टाकण्याची घोषणा ११ सप्टेंबर रोजी केली. 

* पूर्व पश्चिमी लडाखच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या लष्कराच्या १४ कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

* देशभरातील अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून अंगणवाडी सेविका यांचे मानधन ३००० वरून ४५००, आशा वर्करच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. 

* केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ७ सप्टेंबर रोजी चौथ्या जागतिक प्रमाणन परिषदेचे नवी दिल्ली येथे उदघाटन केले. या परिषदेचा मुख्य विषय [निष्पत्ती आधारित प्रामाणिकरणातील आव्हाने आणि संधी] हा होता. 

* गुजरातमधील वडोदरा येथे देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ ५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आले. 

* हिमाचल प्रदेशमधील किन्नोर जिल्ह्यातील लिप्पा असरांग वन्यजीव अभयारण्यात अतिशय दुर्मिळ हिमचित्ता आढळून आला. 

* बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजी असलेले आशियातील पहिले विमानतळ ठरले आहे. 

* ऍक्सिस बँकेत ९ वर्षांपासून सीईओ व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या शिखा शर्मा यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपत असून त्यांची जागा अमिताभ चौधरी घेणार आहेत. 

* जगभरातील समुद्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच समुद्राची सफाई करण्यासाठी ओशियन क्लीन अप ही जगातील सर्वात मोठी मोहीम कॅलिफोर्निया येथे ८ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली. 

* भारताला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅक प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमा दासला आसाम राज्याची स्पोर्ट्स अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

* अलीबाबा या चीनमधील प्रसिद्ध ईकॉमर्स कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांनी २०१९ मध्ये निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले आहे.  

* जॅक मा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. त्यांची ऐकूण संपत्ती ३६.६ अब्ज डॉलर्स आहे. निवृत्तीनंतर ते अध्यापनाच्या क्षेत्राकडे वळणार आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.