रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

भारताचा मानवी विकास निर्देशांकात प्रगती - १४ सप्टेंबर २०१८

भारताचा मानवी विकास निर्देशांकात प्रगती - १४ सप्टेंबर २०१८

* संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमांतर्गत यूएनडीपी जाहीर झालेल्या मानवी विकास निर्देशांकात एचडीआय भारताचा क्रमांक १३० आहे. यात १८९ देशांचा समावेश आहे.

* दक्षिण आशियात विभागात भारतात मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य सरासरी ०.६३८ आहे. साधारण समान लोकसंख्या असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांचा क्रमांक अनुक्रमे १३६ व १५० आहे.

* २०१६ मध्ये [एचआयडी] मूल्य ०.६२४ होते. मानवी विकासाची तीन स्तरावरील दीर्घकालीन प्रगतीचे मोजमाप म्हणजे एचआयडी असे समजले जाते. हे स्तर म्हणजे दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञान मिळण्याची संधी व चांगली जीवनशैली या तीन स्तरावर प्रगतीचे मूल्य मोजले जाते.

* या यादीत नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया व जर्मनी हे देश अग्रस्थानी आहेत. नायगेर, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, दक्षिण सुदान, छाड व बुरुंडी आदी देश तळात आहेत.

* यात एकूण १८९ देशांचा समावेश होता त्यात १३० वा भारताचा क्रमांक, १३६ वा बांगलादेशचा क्रमांक, १५० पाकिस्तानचा क्रमांक होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.