शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

अष्टपैलू क्रिकेटपटू पॉल कॉलिंगवूडची निवृत्ती - १३ सप्टेंबर २०१८

अष्टपैलू क्रिकेटपटू पॉल कॉलिंगवूडची निवृत्ती - १३ सप्टेंबर २०१८

* इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू पॉल कॉलिंगवूडने गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली. प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पण केल्यानंतर २२ वर्षानंतर यंदाच्या हंगामासह व्यवसायिक कारकिर्दीतून निवृत्त होणार असल्याचे कॉलिंगवूडने स्पष्ट केले.

* तीन वेळा ऍशेस विजेत्या संघात समावेश असलेल्या कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१० मध्ये २०\२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम दाखवला होता.

* त्याच्या कसोटी सामन्यात त्याने एकूण ६८ खेळून, ४२५९ धावा, १० शतके, २० अर्धशतके, १७ बळी, ९६ झेल घेतले.

* एकदिवसीय सामन्यात १९७ सामने खेळून, ५०९२ धावा, ५ शतके, २६ अर्धशतके, १११ बळी, १०८ झेल. तर २०/२० सामन्यात एकूण ३६ सामने खेळून ५८३ धावा, ० शतके, ३ अर्धशतके, १६ बळी, झेल १५ अशी त्याची कामगिरी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.