बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

केंद्राची शेतमाल अन्नदाता संरक्षण योजना - ११ सप्टेंबर २०१८

केंद्राची शेतमाल अन्नदाता संरक्षण योजना - ११ सप्टेंबर २०१८

* आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारने बुधवारी मंदीच्या काळातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभावाएवढी किंमत हमखास मिळवून देण्यासाठी [प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान] पीएम आशा नावाची योजना मंजूर केली. 

* शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट हमीभाव देण्याचे व त्यायोगे शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२० पर्यंत दुप्पट करण्याच्या महत्वाकांक्षी वचनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आह. 

* यासाठी तेलबियांच्या खरेदीसाठी खासगी व्यापाऱ्यांचा सहभाग घेण्याची पीपीपीएस योजना पथदर्शी स्वरूपात निवडक क्षेत्रात राबविण्याचा पर्याय राज्यांना देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 

* यासाठी ज्याचा हमीभाव आधीच जाहीर झाला आहे. असे एखादे तेलबियांचे पीक निवडून ही योजना निवडक जिल्ह्यात किंवा बाजार समितीत राबविता येईल. 

* शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी होणार असल्याने हा पीएसएस किंवा पीडीपीएस किंवा पीएसएस योजना पर्याय असेल. जेव्हा बाजारभाव हमीभावाहून कमी असेल तेव्हा खरेदीकारास हमीभावाच्या कमाल १५ टक्क्यापर्यंतची रक्कम सेवाशुल्क म्हणून सरकारकडून दिली जाणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.