शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

मोदींच्या हस्ते भारतीय पोस्टल पेमेंट बँकेचे उदघाटन - २ सप्टेंबर २०१८

मोदींच्या हस्ते भारतीय पोस्टल पेमेंट बँकेचे उदघाटन - २ सप्टेंबर २०१८

* मोदींच्या हस्ते भारतीय पोस्टल पेमेंट बँकेचे उदघाटन करून १.५५ लाख लाख पोस्ट कार्यालये ३१ डिसेंबरपर्यंत पोस्ट पेमेंट बँकेशी जोडण्यात येतील.

* पोस्ट पेमेंट बँकेच्या ६५० शाखाव्यतिरिक ३ हजार संपर्क केंद्राच्या माध्यमातून लोक बँकिंग सेवा वापरू शकतील. पोस्ट पेमेंट बँकेला देण्यात येणारे अर्थसहाय्य गेल्याच आठवड्यात सरकारने ८० टक्कयांनी वाढवून १,४३५ कोटी केले आहे.

* या बळावर ही पेमेंट बँक आणि पेटीएम पेमेंट बँक यासारख्या मोठ्या कंपन्यांशी टक्कर देऊ शकेल. या बँकेत बचत व चालू खाते, पैशाचे हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण, बिल व पेमेंट सेवा, व्यवसाय व व्यापारी पेमेंट सेवा इत्यादी सुरु होतील.

* पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवेचा ग्राहकांना विविध प्रकारे लाभ घेता येईल. शाखेतील काउंटर सेवा, एटीएम, मोबाईल बँकिंग अँप, एसएमएस आणि आयव्हीआर इंटरऍक्टिव्ह रिस्पॉन्स यांचा त्यात समावेश आहे.

* ३ लाख पोस्ट कर्मचारी आणि अत्याधुनिक डिजिटल सेवा अशी अनोखी जोड घालून ही बँक सेवा देणार आहे. त्यामुळे ती प्रभावी होईल.

* १ लाखांपर्यतच्या ठेवी ही बँक स्वीकारु शकेल. बँक कर्ज देऊ शकणार नाही. तथापि तिसऱ्या पक्षाची उत्पादने विकू शकेल. पंजाब नॅशनल बँकेची एजंट म्हणून बँक काम करील.

* ७ कोटी बचत खाती पोस्टातील पोस्ट पेमेंट बँकेत जोडली जातील. खाजगी पेमेंट बँकाच्या स्पर्धेत याचा मोठा लाभ बँकेला होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.