रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

इंडोनेशियात भूकंप व त्सुनामीमुळे ८३२ नागरिकांचा मृत्यू - १ ऑक्टोबर २०१८

इंडोनेशियात भूकंप व त्सुनामीमुळे ८३२ नागरिकांचा मृत्यू - १ ऑक्टोबर २०१८

* इंडोनेशियातील सुलावेसी बेटाला शुक्रवारी रात्री बसलेल्या ७.५ रिश्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंपाचा धक्का व त्यानंतर आलेली त्सुनामी यामुळे मरण पावलेल्यांची संख्या ८३२ वर पोहोचली आहे.

* मृतांचा आकडा हजारोच्या संख्येत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सुलावेसी बेटावरील पाचही जिल्ह्याना या नैसर्गिक संकटाचा तडाखा बसला असून त्यातील फक्त एका जिल्ह्यात मदतकार्य सुरु करणे शक्य झाले आहे.

* पालू शहरामध्ये दोन हॉटेल व एक मॉलची इमारत कोसळली आहे. त्याच्या खाली शेकडो लोक अजूनही असू शकतात अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.

* या आपत्तीमुळे मोठया प्रमाणावर हानी झालेल्या पालू शहराला राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी रविवारी पाहणी केली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.