मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

MPSC घोषणापत्र ओळखीच्या पुराव्याबाबत - १४ ऑगस्ट २०१८

MPSC घोषणापत्र ओळखीच्या पुराव्याबाबत - १४ ऑगस्ट २०१८

* आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांकरीता परीक्षेस येताना ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधारकार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी किमान कोणतेही दोन मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या छायांकित प्रति सोबत आणणे अनिवार्य असल्याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १२ एप्रिल २०१८ व ७ जून २०१८ १२ जून २०१८ रोजीच्या घोषणेद्वारे सूचना देण्यात आली.

* आयोगामार्फ़त आयोजित परीक्षेमध्ये उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या गैरप्रकाराच्या प्रयत्नांना अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनेचा भाग म्हणून परीक्षेच्या वेळी उमेदवाराची बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवाराची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पडताळणी करण्यात आली. अशा परीक्षाकरिता वर नमूद पाच वैध ओळखपत्रांपैकी दोन मूळ ओळखपत्राऐवजी एका मूळ ओळखपत्राच्या आधारे उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

* आयोगाच्या उपरोक्त नियमाच्या अनुषंगाने ज्या परीक्षाकरिता उमेदवाराची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पडताळणी करण्यात येणार आहे. अशा परीक्षेकरिता उमेदवाराची स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य राहील.

* वर नमूद पाच वैध मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी त्यांच्या छायांकित प्रति अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व संबंधित उमेदवाराला परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.

* ओळखीच्या पुराव्यासाठी परीक्षेच्या वेळी सादर करावयाच्या ओळ्खसंदर्भात संबंधित परीक्षेच्या प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनाचे वेळोवेळी अवलोकन करणे. उमेदवाराच्या हिताचे राहील.

* सादर निर्णयाची अंमलबजावणी दिनांक ६ ऑगस्ट २०१८ नंतर आयोजित परीक्षाकरिता करण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.