शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

माजी राज्यमंत्री आणि सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे निधन - ११ ऑगस्ट २०१८

माजी राज्यमंत्री आणि सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे निधन - ११ ऑगस्ट २०१८

* अकोला जिल्ह्यात सहकाराचे बीजारोपण करून त्याचा वटवृक्ष करणारे, वऱ्हाडी भाषेतील पहाडी आवाज, रुबाबदार व्यक्ती असे व्यक्तिमत्व आज समाजातून निघून गेले.

* विदर्भाच्या कृषी, सहकार, शिक्षण, उद्योग, व्यापार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विदर्भातील ज्येष्ठ नेते वसंतरावजी धोत्रे यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले.

* महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष होते. तसेच शिवाजी शिक्षण संस्थेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परिवर्तन करून हर्षवर्धन देशमुख, दिलीप इंगोले व त्यांच्या संचालकांना एकहाती सत्ता मिळवून देण्यात त्यांनी मोलाचे कार्य केले.

* ते १९८६ ते १९८८ सहकार खात्याचे राज्यमंत्री होते. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणून त्यांची ओळख आहे. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर त्यांना साथ देणाऱ्या विदर्भातील प्रमुख नेत्यात त्यांचा समावेश होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.