शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

अक्षय व्यंकटेश यांना मनाचा 'फिल्ड्स' पुरस्कार प्रदान - ४ ऑगस्ट २०१८

अक्षय व्यंकटेश यांना मनाचा 'फिल्ड्स' पुरस्कार प्रदान - ४ ऑगस्ट २०१८

* भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियाचे नागरिक अक्षय व्यंकटेश वय ३६ यांना फिल्ड्स पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. व्यंकटेश यांच्यासह अन्य तीन जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

* व्यंकटेश यांना फिल्ड्स पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. व्यंकटेश यांच्यासह अन्य तीन जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पदकाची किंमत सुमारे २.७३ लाख रुपये आहे.

* हा पुरस्कार मिळविणारे मंजुल भार्गव हे भारतीय वंशाचे पहिले गणितज्ञ ठरले. त्यांना २०१४ मध्ये हा पुरस्कार  देण्यात आला.

* हा पुरस्कार गणितामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना दिला जातो. गणितज्ञ क्षेत्रात या पुरस्काराला नोबेलच्या दर्जाचे मानले जाते.

* ब्राझीलमधील रियो दि जानिरो येथे बुधवारी आयोजित आंतरराष्ट्रीय गणित परिषदेत पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. फिल्ड्स पदक दर ४ वर्षांनी ४० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या गणितज्ञाना दिले जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.