बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

भारताला एसटीए-१ चा दर्जा - ३१ जुलै २०१८

भारताला एसटीए-१ चा दर्जा - ३१ जुलै २०१८

* अमेरिकेने भारताचा समावेश [स्ट्रॅटेजिक ट्रेड अथोरोयजेशन - १ एसटीए ] यादीत केला असून, त्यामुळे अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञान आयात करण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याची माहिती भारताचे अमेरिकेतील दूत नवतेजसिंह सरना यांनी दिली.

* जगभरातील ३५ देशांना अमेरिकेचा एसटीए-१ चा दर्जा प्राप्त असून आता भारतही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. हा दर्जा प्राप्त करणारा भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश असून, आशियातील जपान, दक्षिण कोरिया या देशांचाही या यादीत समावेश आहे. 

* अमेरिकेचा हा निर्णय केवळ भारताप्रती वाढत असलेल्या विश्वासाचे प्रतीक नसून, आर्थिक व संरक्षण क्षेत्रातील एक भागीदार या नात्याने भारताच्या क्षमतेला दिलेली एक प्रकारची हाक आहे.

* अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण व्यवस्थेत भारताचे स्थान पाहता करण्यात आलेला हा महत्वाचा बदल आहे. भरतासोबतचे आर्थिक बदल असून भारतासोबतचे आर्थिक व संरक्षण संबंध आमच्या दृष्टीने महत्वाचे असल्यामुळेच भारताला हा दर्जा देण्यात आल्याचे विब्लर रॉस यांनी स्पष्ट केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.