बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये - १५ ऑगस्ट २०१८

९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये - १५ ऑगस्ट २०१८

* अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ९२ वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळ होणार असल्याची अधिकृत घोषणा आज केली.

* विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि वि. भी. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करणार आहे.

* दोन्ही संस्थांच्या निमंत्रणावरून महामंडळाच्या स्थळ निवड समितीने यवतमाळला ५ ऑगस्टला भेट दिली होती. त्यानंतर समितीचा अहवाल पुढील बैठकीत येऊन घोषणा करण्याची परंपरा आहे.

* यांच्यापूर्वी ४५ वर्षांपूर्वी १९७३ मध्ये ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेत यवतमाळमध्ये साहित्य संमेलन झाले होते. दरम्यानच्या काळात यवतमाळमधून प्रस्ताव येत राहिले. पण यंदा ही संधी चालून आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.