बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

आशियाई स्पर्धेत मनजीत सिंगला ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक - २९ ऑगस्ट २०१८

आशियाई स्पर्धेत मनजीत सिंगला ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक - २९ ऑगस्ट २०१८

* मनजीत सिंगने मंगळवारी आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या ८०० मीटर दौड स्पर्धेत प्रबळ दावेदार मायदेशातील सहकारी जिनसन जॉन्सन पिछाडीवर सोडत सुवर्णपदकावर नाव कोरले. यामुळे जॉन्सनला मात्र रौप्यपदक समाधान मानावे लागले.

* मंगळवारी भारताने आपल्याला एकूण पदकांची संख्या ५० अशी केली. २८ वर्षीय मनजीतने १ मिनिट ४६.१५ सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना प्रथमच प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स अजिंक्यपद ८०० मीटर स्पर्धेत श्रीराम सिंगचा ४२ वर्षे जुना विक्रम मोडणारा दुसऱ्या स्थानी राहिला.

* ८०० मीटरमध्ये आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय धावपटूंनी अव्वल दोन स्थान पटकावयची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी नवी दिल्लीमध्ये १९५१ ला झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेत रंजीत सिंग व कुलवंत सिंग हा पराक्रम केला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.