शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन - २४ ऑगस्ट २०१८

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन - २४ ऑगस्ट २०१८

* ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे ६३ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. विजय चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत होते.

* मोरूची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहते. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

* त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटके प्रचंड गाजली होती.

* अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या [वाहिनीची माया] या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.