शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

राज्यात सुरु होणार ४० पोस्टल पेमेंट बँका - ४ ऑगस्ट २०१८

राज्यात सुरु होणार ४० पोस्टल पेमेंट बँका - ४ ऑगस्ट  २०१८

* या वर्षाअखेर देशातील सर्व १.५५ लाख टपाल कार्यालयात पोस्टल बँकेच्या शाखा सुरु होणार असून, या महिन्यात ३२५० टपाल कार्यालयात ही शाखा सुरु होईल. त्यातील ४० बँका महाराष्ट्रात सुरु होतील.

* पोस्टल पेमेंट बँका प्रामुख्याने ग्रामीण भागात असतील. पेमेंट बँकेच्या एकूण १.५५ शाखा ऍक्सेस पॉईंट असतील. पहिल्या टप्प्यात सुरु होणाऱ्या ३२५० शाखा ऍक्सेस पॉईंटपैकी ४० महाराष्ट्रात व दोन गोव्यात सुरु होतील.

* पोस्टल पेमेंट बँकेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सेठी यांनी सांगितले की आम्ही डिजिटल बँकेसारखे काम करू. शाखेत ग्राहकांच्या अंगठ्याचा ठसा बायोमेट्रिक मशीनवर स्कॅन करून देवाण घेवाण होईल. ही पूर्णपणे पेपरलेस बँक असेल.

* महाराष्ट्रात सुरु होणाऱ्या पोस्टल बँका पुढीलप्रमाणे - अहमदनगर, अकोला, अलिबाग, अमरावती, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, बारामती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, माळवा, मुंबई अंधेरी, मुंबई गिरगाव, नागपुर, नाशिक, नवापूर, पालघर, पनवेल, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.