शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन - १ सप्टेंबर २०१८

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन - १ सप्टेंबर २०१८

* ऑस्ट्रेलियाच्या लिबरल पक्षामध्ये पंतप्रधान माल्कम टर्नबल यांच्याविरोधात बंड झाल्यानंतर, पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन यांची निवड करण्यात आली आहे.

* पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीमध्ये मॉरिसन यांनी माजी गृहमंत्री पीटर डटन यांचा पराभव केला.  ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षात ६ पंतप्रधानाची निवड झाली आहे.

* टर्नबल यांनी गेल्या आठवड्यामध्ये ऊर्जा कपातीसाठी एक ठराव आणला होता.  यामध्ये विजेचे दर कमी करतानाच, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कार्बन उत्सर्जनमध्ये कपात करण्यात आली आहे.

* त्यावरून पक्षामध्ये त्यांच्याविरोधात बंड झाले आणि बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी त्यांच्याऐवजी अन्य नेत्यांची निवड करण्याचे निवेदन दिले होते.

* ऑस्ट्रेलियामध्ये काही महिन्यामध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून त्यामध्ये मॉरीसन पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.