शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

ओबीसीला आयोगाला घटनात्मक दर्जा - ३ ऑगस्ट २०१८

ओबीसीला आयोगाला घटनात्मक दर्जा - ३ ऑगस्ट २०१८

* ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे १२३ वे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. सर्व पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ४०३ विरुद्ध शून्य अशा दोन तृतीयांशहुन अधिक मातांनी विधेयक संमत झाले.

* अनुसूचित जाती, जमातीच्या यादीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करणे किंवा वगळणे याचे अधिकार राज्य सरकारांना या विधेयकामुळे मिळणार आहे. यापूर्वी हे अधिकार राज्यपालांकडे होते.

* ओबीसी आयोगामध्ये एक महिला आणि अल्पसंख्याक समाजाचे सदस्य असतील. राज्य सरकारकडून आलेला प्रस्ताव रजिस्ट्रार जनरलकडे अभिप्रायासाठी पाठविला जाईल.

* तेथून हिरवा कंदील आल्यास अनुसूचित आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाच्या संमतीनंतर मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव येईल.
* त्यानंतर विधेयक बनवून संसदेपुढे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जाईल. त्याला मंजुरी दिल्यानंतर त्यासंबंधीचा अध्यादेश लागू करण्यात येईल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.