रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

डॉ नरेंद्र दाभोळकरावर गोळी झाडणाऱ्याला अटक - १९ ऑगस्ट २०१८

डॉ नरेंद्र दाभोळकरावर गोळी झाडणाऱ्याला अटक - १९ ऑगस्ट २०१८

* ज्येष्ठ समाजसेवक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक केली असल्याचे एटीएसच्या वतीने आज शनिवारी सांगण्यात आले.

* नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकर जवळचा मित्र सचिन अणूदुरेची माहिती मिळाली.

* त्या आधारे सचिनला सर्वात प्रथम औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांच्या चौकशीदरम्यान सचिनकडून दाभोळकरांच्या हत्येचे धागेदोरे मिळाल्याने एटीएसने स्पष्ट केले आहे.

* सचिन हा औरंगाबादमध्ये एका दुकानांमध्ये अकाउंट म्हणून काम करतो. या प्रकरणात जालन्यातूनही एकाला अटक करण्यात आले.

* २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोळकर पुण्यात असताना मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हा तपास ५ वर्षांपासून चालू होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.