रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

आशियाई स्पर्धेत तेजेंदरपाल सिंगला सुवर्णपदक - २६ ऑगस्ट २०१८

आशियाई स्पर्धेत तेजेंदरपाल सिंगला सुवर्णपदक - २६ ऑगस्ट २०१८

* तेजिंदरपाल सिंग तूरने पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करीत भारताला आशियाई गेममध्ये ऍथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी पदकाचे खाते उघडून दिले.

* २३ वर्षीय तेजिंदरने २०.७५ मीटर गोळाफेक करीत राष्ट्रीय विक्रम नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने सहा वर्षांपूर्वी ओम प्रकाश करहानाने नोंदविलेला २०.६९ मीटरचा विक्रम मोडला.

* भारताचे या स्पर्धेतील हे सातवे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी स्टार स्क्वाशपटू दीपिका पल्लिकल व ज्योत्स्ना चिनप्पा यांना महिला एकेरीत उपांत्य लढतीत पराभव स्वीकारावा लागला.

* बॅडमिंटनमध्ये पी व्हि सिंधू व सायना नेहवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत उपांत्यफेरीत फेरी गाठली. यापूर्वी भारताच्या दोन धावपटूंनी मोहम्मद अनस याहिया आणि राजीव अकोरिया यांनी पुरुषांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.