शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

नासा करणार थेट सूर्यावर स्वारी - १२ ऑगस्ट २०१८

नासा करणार थेट सूर्यावर स्वारी - १२ ऑगस्ट २०१८

* चंद्र व मंगळावर स्वाऱ्या केल्यानंतर नासा अतिशय तप्त अशा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तिथे अंतराळ यान पाठवीत आहे. सोलर पार्क प्रोब असे या यानाचे नाव असून ते सूर्यामध्ये होणाऱ्या गूढ स्फोटाचा त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करणार आहे. 

* सोलर पार्क प्रोब हे यान एका कारच्या आकाराचे असून ते सूर्याच्या पृष्ठभागावरून ४० लाख मैल दूर अंतरावरून त्याच्या कार्यकक्षेचा अभ्यास करणार आहे. 

* महत्वाचे म्हणजे आजपर्यंत सूर्याची उष्णता व प्रखर प्रकाशाचा कोणत्याही यानाने सामना केलेला नाही. फ्लोरिडाच्या केप केनवेरेल नाही. फ्लोरिडाच्या केप केनवेरेल येथून हे यान सूर्याकडे झेपावनार आहे. 

* सोलर पार्क प्रोब या यानाला युनायटेड लॉन्च अलायन्सच्या डेल्टा ४ या रॉकेटद्वारे सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील काही महिन्यातच हे यान सूर्याजवळ पोहोचेल. 

* हे यान आतापर्यंतच्या इतिहासात मानवनिर्मित कोणत्याही यानापेक्षा सर्वात जवळ जाऊन सूर्याचे निरीक्षण करणार असल्याचे शस्त्रज्ञानी सांगितले आहे. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कक्षेचे तापमान ३०० पटींनी जास्त असते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.