गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

इस्रोची गगनयान अंतराळ मोहीम - ३० ऑगस्ट २०१८

इस्रोची गगनयान अंतराळ मोहीम - ३० ऑगस्ट २०१८

* भारतीय अंतराळ वीरांना सोबत घेऊन अंतराळात अवकाशात पाठविण्याची गगनयान ही महत्वाकांक्षी योजना इस्रोचे आखली असून २०२२ चे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून जय्यत तयारी सुरु केली आहे.

* स्वतंत्रदिनी केलेल्या भाषणात गगनयानची घोषणा करताना भारतीय यानातून भारताचा पहिला सुपुत्र व सुकन्या अंतराळात झेपावेल आणि तेथे तिरंगा फडकवेल.

* पंतप्रधानांच्या या योजनेचा तपशील अणुऊर्जा व अंतराळ संशोधन खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग इस्रोचे अध्यक्ष के सिवान यांनी सांगितले.

* मानवाला अंतराळात पाठविण्याची ही मोहीम १० हजार कोटी रुपयांहून कमी खर्चात फत्ते करण्याचे उद्दिष्ट आहे. मोहीम यशस्वी मानवासह अंतराळयान सोडणारा भारत हा अमेरिका, रशिया, व चीननंतर चौथा देश ठरेल.

* या मोहिमेत तीन अंतराळवीरांना घेऊन यान अवकाशात झेपावेल. हे यान पृथ्वीपासून ३०० ते ४०० किमी अंतराच्या कक्षेत सात दिवस प्रदक्षिणा घालेल.

* इस्रोखेरीज विविध विद्यापीठे खासगी उद्योग तसेच सरकारी व खासगी संशोधन संस्थांचा सक्रिय सहभाग असल्याने गगनयान राष्ट्रीय अभिमानाची मोहीम असेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.