बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

भारतात ५ जी नेटवर्क सेवा २०२२ पर्यंत सुरु होणार - ८ ऑगस्ट २०१८

भारतात ५ जी नेटवर्क सेवा २०२२ पर्यंत सुरु होणार - ८ ऑगस्ट २०१८

* भारतात २०२२ पर्यंत उच्च गती असलेली अत्याधुनिक ५ जी दूरसंचार सेवा सुरु होईल, असे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले.

* सुंदरराजन यांनी म्हटले की २०२२ पर्यंत ५ जी सेवा पूर्णांशाने सुरु होईल. ही सेवा पुरवठ्यावर आधारित नसेल. ती मागणीवर आधारित असेल. इतर उद्योगांनी त्यादृष्टीने तयारी करायला हवी.

* दूरसंचार सेवेचे आधुनिक तंत्रज्ञान स्विकारण्याच्या बाबतीत भारत आतापर्यंत अन्य देशांच्या तुलनेत पिछाडीवर होता. ४ जी सेवा भारतात खूप उशीरा आली. परंतु ५ जीच्या बाबतीत फार उशीर होणार नाही.

* दक्षिण कोरिया, जपान व चीन यासारख्या देशांचा येत्या दोन वर्षात ५ जी तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आहे. भारत त्यांच्या पाठोपाठ असेल असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

* सॅनफोर्ड सी बर्नस्टीनचे हाँगकाँगस्थित विश्लेषक क्रिस्टोफर लेन म्हणाले की दक्षिण कोरियात मार्च २०१९, जपानमध्ये २०१९ च्या अखेरीस, तर चीनमध्ये २०२० मध्ये ५ जी सेवा सुरु होईल.

* भारतात २ वर्षे उशीर होत असला तरी ते पथ्यावर पडणारेच ठरेल. तोपर्यंत ५ जी हँडसेटच्या किमती कमी झालेल्या असतील. ५ जीमुळे संपर्क व्यवस्थेत क्रांती होईल.

* ऊर्जेचा कमी वापर, डाऊनलोडसाठी प्रचंड गती आणि क्षमताही त्यात असेल. स्वयंचलित वाहने, ड्रोन, रिमोटच्या मदतीने शस्त्रक्रिया, आणि वाहतूक नियंत्रण या क्षेत्रातही ५ जीचा वापर होईल.







0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.