मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

नीरज चोप्रा सुवर्णपदक पटकावणारा पहिला भालाफेकपटू - २९ ऑगस्ट २०१८

नीरज चोप्रा सुवर्णपदक पटकावणारा पहिला भालाफेकपटू - २९ ऑगस्ट २०१८

* युवा नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने साजेशी कामगिरी करत ८८.६ मीटरच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.

* विशेष म्हणजे यंदाच्या आशियाई स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यामध्ये भारतीय ध्वज वाहक म्हणून त्याने कर्तव्य बजावले आणि सुवर्णपदक पटकावले.

* नीरजचे सुवर्णपदक हे आशियाई स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत दुसरे पदक होय. याच्या आधी १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे गुरतेजसिंगने कांस्यपदक पटकावले होते.

* चिनी तैपेईचा चाओ सून चेंग याला नीरजचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानले जात होते. त्याने गेल्या वर्षी ९१.३६ मीटर अंतराची जबरदस्त भालाफेक केली होती. पण चेंग याला यावेळी ७९.८१ मीटर अंतराची भालाफेक करता आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.