शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

सर्वात लांब पल्ल्याची तोफ पुण्यात विकसित - २५ ऑगस्ट २०१८

सर्वात लांब पल्ल्याची तोफ पुण्यात विकसित - २५ ऑगस्ट २०१८

* सर्वात लांब पल्ल्याचे लक्ष्य उध्वस्त करण्याची क्षमता असलेली जगातील एकमेव तोफ अटॅग्स लष्करात येणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान पुण्यातील पाषाण येथील अर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट एआरडी म्हणजे आयुध संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे. येत्या दोन वर्षात ही तोफ वापरासाठी उपलब्द होईल.

* एआरडी हीरक महोत्सवी वर्ष असून संस्थेच्या स्थापनेस एक सप्टेंबर रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेने गेल्या वर्षात तिन्ही दलासाठी शस्त्रांचे तंत्रज्ञान निर्मिती करून संरक्षण क्षेत्रास मोठे योगदान दिले आहे.

* छोट्या रिव्हॉलव्हरपासून ते रॉकेट लॉन्चरपर्यंत शस्त्रास्त्रे या संस्थेने विकसित केले आहे. आकाश, पृथ्वी, नाग, यासारख्या क्षेपणास्त्र आणि त्यांचे बॉम्ब तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर ते संरक्षण दल आणि खासगी क्षेत्राला हस्तांतरण करण्यात आलेले आहेत.

* रणगाडाविरोधी अदृश्य भू सुरंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. रणगाड्यावरून अदृश्य भू सुरुंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. मेटल डिटेक्टरलाही हुलकावणी देणारे तंत्रज्ञान यात आहे.

* रणगाड्यवरुन विशिष्ट दिशेला डागता येणारी क्षेपणास्त्रे तसेच पिनाका रॉकेट लॉन्चर सिस्टीमही एआरडीईने तयार केली आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.