गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन - १६ ऑगस्ट २०१८

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन - १६ ऑगस्ट २०१८

* भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

* ते ९३ वर्षाचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले ९ आठवडे दिल्लीच्या एम्स मध्ये ते दाखल होते.

* जनता पक्षाच्या प्रयोगानंतर फाटाफूट झालेल्या जनसंघापासून ते केंद्रात भाजपच्या पहिल्या सरकारचे पंतप्रधान असा वाजपेयांचा राजकीय प्रवास सुरु झाला.

[ अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवन प्रवास ]

* संघपरिवारातील भारतीय जनता पक्षाच्या उभारणीतील एक अग्रणी व्यक्तमत्व असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला.

* कृष्णबिहारी वाजपेयी व कृष्णदेवी वाजपेयी यांचे ते पुत्र होते. अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य असून ते भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. अटल बिहारी वाजपेयी भारताचे १० वे पंतप्रधान होते.

* १९९६ साली पहिल्यांदा भाजपने अन्य पक्षांच्या साथीने केंद्रात सरकार बनविले. वाजपेयींचा पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ फक्त १३ दिवसांचा होता. १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

* भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. जे सरकार १३ महिने चालले. जयललिता यांच्या पक्षाने पाठिंबा काढल्यामुळे १७ एप्रिल १९९९ रोजी अवघ्या एका मताने वाजपेयी सरकार कोसळले.

* त्यानंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. यावेळी एनडीएच्या प्रयोग यशस्वी झाला आणि वाजपेयींना १९९९ ते २००४ असा पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला.

* पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. अटल बिहारी वाजपेयी तब्बल १० वेळा लोकसभेवर आणि २ वेळा राज्यसभेवर निवडून गेले.

* २००९ पर्यंत ते उत्तरप्रदेश लखनौ मधून निवडून गेले. मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते.

* जनता पक्षाचे आघाडी सरकार कोसळल्यानंतर वाजपेयींना १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. २५ डिसेंबर २०१४ रोजी वाजपेयींच्या जन्मदिनी भारताच्या राष्ट्रपतींची वाजपेयींना भारतरत्न पुरस्काराची घोषणा केली.

* भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. २७ मार्च २०१५ रोजी त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाजपेयींचा जन्मदिवस हा देशात सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.