बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

एम के स्टॅलिन द्रमुकचे नवे अध्यक्ष - २९ ऑगस्ट २०१८

एम के स्टॅलिन द्रमुकचे नवे अध्यक्ष - २९ ऑगस्ट २०१८

* द्रमुकचे दिवंगत प्रमुख मुथुवेल करुणानिधी यांचे वारसदार बनण्याचा बहुमान त्यांचे पुत्र एम के स्टॅलिन यांना मिळाला आहे.

* पक्षाध्यक्षपदी त्यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. याबरोबर तामिळनाडूतील मुख्य विरोधी पक्षाच्या राजकारणात नवा अध्याय सुरु झाला आहे.

* एम के स्टॅलिन हे द्रमुकचे दुसरे अध्यक्ष बनले आहेत. तत्पूर्वी पिता करुणानिधी यांनी तब्बल ५० वर्षे पक्षाचे कणखरपणे नेतृत्व केले. १९६९ मध्ये द्रमुकच्या अध्यक्षपदी ते विराजमान झाले होते.

* करुणानिधींचे पुत्र अलागिरी व स्टॅलिन यांच्यात द्रमुकचे नेतृत्व करण्यावरून वाद सुरु होता. त्यांच्यातील जोरदार रस्सीखेच अखेर स्टॅलिन यांनी बाजी मारली.

* चेन्नई येथे द्रमुकच्या कार्यकारिणी उच्चस्तरीय बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस के अंबाजगन यांनी स्टॅलिन यांच्या विजयाची घोषणा केली. त्यानंतर टाळ्यांचा गजर करत सर्वानी स्टॅलिन यांचे अभिनंदन केले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.