मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

जिओ कमाईच्या बाबतीत देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी - २८ ऑगस्ट २०१८

जिओ कमाईच्या बाबतीत देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी - २८ ऑगस्ट २०१८

* अवघ्या दोन वर्षांमध्ये 'रिलायन्स जिओ इन्फोकॉम' कमाईच्या बाबतीत देशातील दुसरी टेलिकॉम मोठी कंपनी बनली आहे. महसुली उत्पन्नाच्या निकषात जिओने वोडाफोनला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

* पहिल्या क्रमांकावर एअरटेल कायम असून आता जिओ आणि एअरटेल अंतर बरेच कमी झाले आहे. कमी पैशामध्ये इंटरनेट सेवा आणि गावागावात पोहोचलेले नेटवर्क यामुळे जिओच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.

* परिणामी कंपनीच्या उत्पन्नामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. ४ जी सेवा सादर केल्यानंतर गेल्या दोन वर्षात महसुली उत्पन्नाच्या बाजारपेठेत जिओ च्या बाजार हिश्यात मोठी वाढ झाली आहे.

* जून २०१८ च्या तिमाहीत कंपनीचा बाजारहिस्सा २२.४ टक्क्यावर पोहोचला. ट्रायच्या आकडेवारीनुसार मार्च २०१८ तिमाहीच्या तुलनेत जूनअखेर २.५३ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

* महसुली उत्पन्नाच्या निकषाच्या जून २०१८ च्या तिमाहीनुसार एअरटेल ३१.७ टक्क्यासह पहिल्या क्रमांकावर आहे. २२.४ % सह जियो दुसऱ्या क्रमांकावर, वोडाफोन १९.३% व आयडिया १५.४% सह चौथ्या क्रमांकावर आहेत.

* जिओ लवकरच एअरटेललाही मागे टाकेल अशी शक्यता आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.