बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

काही विशेष चालू घडामोडी - १ ऑगस्ट २०१८

काही विशेष चालू घडामोडी - १ ऑगस्ट  २०१८

* फियाट क्रायस्लर कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ सर्गीयो मार्कियोनी यांचे २५ जुलै रोजी निधन झाले. त्यांचे वय ६६ वर्षे होते.

* अणुकार्यक्रमामुळे अमेरिकेने इराणवर घातलेल्या कडक निर्बंधामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या इराणचे चलन दिवसेंदिवस कोसळत आहे.

* इस्तंबुल येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय खेळाडूनी एकूण १० पदकांची कमाई केली आणि त्यात ७ पदके महिलांनी जिंकली.

* पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत महेशकुमार मलानी संसदीय निवडणूक जिंकणारे पहिले हिंदू ठरले आहेत.

* देशातील सर्व खगोलप्रेमी याबरोबरच नागरिकांनी २७ जुलै रोजी पौर्णिमेला या शतकातील २००१ ते २१०० सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण अनुभवता आले.

* अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यात दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ लोकसभेत ३० जुलै रोजी आवाजी मतदानाने मंजूर झाले.

* देशभरातील ६५० शाखा आणि १७ कोटी खात्यांसह बहुप्रतीक्षित [इंडिया पोस्ट पेमेंट बँक] IPPB ऑगस्टपासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे.

* अमेरिकेतील ९-११ प्रमाण विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोनने हल्ला होऊ नये म्हणून राजधानी दिल्लीला सुरक्षित आणि अभेदय करण्याच्या दृष्टीने भारताने प्रयत्न सुरु केले आहेत.

* औरंगाबादचा मॅरेथॉनपटू नितीन घोरपडेने जर्मनीतील हॅम्बुर्ग येथील स्पर्धा जिंकत [आयर्न मॅन] हा किताब पटकावला आहे.

* अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सीईओ भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या सीमा नंदा यांची नेमणूक करण्यात आली आहे.

* दाऊदी बोहरा मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या अल्पवयीन मुलीच्या खतना प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

* भारताचा माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता सौरभ वर्माने जपानच्या कोकी वातानाबेला पराभूत करत रशिया ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

* भारतात दरवर्षी सुमारे १०० वाघांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव क्लॉ कन्झर्वेशन लेन्स आणि वाईल्डलाईफ या समूहाने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

* इटलीच्या संशोधकांना मंगळाच्या पृष्ठभागाखाली प्रथमच एक मोठे सरोवर असल्याचे आढळून आले आहे.

* कर्नाटकातील कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका अतिशय दुर्मिळ रक्तगटाचा शोध लावला आहे. या रक्तगटाचे नाव पीपी किंवा पी नल फोनोटाईप असे आहे.

* बलुचिस्तान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ताहिरा सफदर या महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.

* आकाशवाणी पुणे केंद्राच्या ख्यातनाम निवेदिता आणि मराठी लेखिका सुद्धा नरवणे वय ८८ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

* अमेरिका सीएएटी या विशेष कायद्यातून भारताला सवलत देणार आहे. या कायद्याअंतर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्यावर निर्बंध आहेत.

* मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने पुलावरून नदीत उडी मारत जलसमाधी घेतली.

* पाकिस्तानात होत असलेल्या मतदान प्रक्रिया आणि निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी १२५ तृतीयपंथींची नेमणूक करण्यात आली आह.

* भारतात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सॅमसंगचा वाटा एकूण बाजारपेठेत ३५% एवढा आहे. तर अमेरिकेच्या अँपल कंपनीचा हिस्सा १४%, वन प्लसबरोबर प्रामुख्याने हुवेई, ओपो, व्हिओ, शाओमी या कंपन्यांचा हिस्सा आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.