शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

राज्यातील ग्रामीण रस्त्यासाठी ९ हजार कोटी निधी मंजूर - २ ऑगस्ट २०१८

राज्यातील ग्रामीण रस्त्यासाठी ९ हजार कोटी निधी मंजूर - २ ऑगस्ट २०१८

* राज्यातील गाव खेड्याना जोडणाऱ्या १६ हजार २२९ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ९ हजार ७७६ कोटी रुपयाची प्रशासकीय मंजुरी दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

* गाव खेड्याना दर्जेदार रस्त्यानी जोडण्याच्या उद्देशाने राज्य सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ही मंजुरी देण्यात आली.

* या योजनेतून ७ हजार ६०० किमी लांबीच्या कामांपैकी आतापर्यंत साधारण ५ हजार ८०४ किमी लांबीची कामे पूर्ण झाली असून १ हजार ७९४ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत.

* योजनेसाठी आतापर्यंत सहा हजार ६८६ कोटी रुपयाचा निधी मिळाला आहे. तसेच रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत खासगी संस्थेकडून परीक्षण केले असता ९६.३३ टक्के रस्त्याचा दर्जा चांगला असल्याचे निदर्शनात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.