मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

विजेसह इंधनाची निर्मिती करणारे सयंत्र विकसित - ७ ऑगस्ट २०१८

विजेसह इंधनाची निर्मिती करणारे सयंत्र विकसित - ७ ऑगस्ट २०१८

* पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना त्याला पर्याय ठरणारे सयंत्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या आयसर शात्रज्ञानी विकसित केले आहे.

* हायड्रोजन वापरून तयार झालेल्या इंधनघटकांद्वारे फ्युएल सेल विजेसह इंधनाचीही निर्मिती होते. येत्या काळात हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर होण्याची शक्यता असल्याने हे संशोधन महत्वाचे आहे.

* या इंधनघटकाचा टेबलफॅन, एलईडी दिवे, आणि दुचाकीवर करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. आयसरमधील सहायक प्राध्यापक डॉ मुहम्मद मुस्तफा यांनी विकसित केलेल्या या इंधनघटाचे संशोधन [नेचर एशिया] या प्रतिष्ठित पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे.

* अलीकडेच टाटा ट्रस्ट आणि इस्रो यांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी बस विकसित केली. तसेच युरोपात पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून हायड्रोजन वापर सुरु झाला आहे.

* त्यामुळे इंधनघटाचे संशोधन सध्या जगभरात सुरु आहे. मात्र अद्याप भारतात हायड्रोजनचा इंधन म्हणून गांभीर्याने विचार करण्यात आलेला नाही.

* हा इंधनघट विजेसह हायड्रोजनचेही उत्सर्जन करतो हे त्याचे वैशिष्टय आहे. डॉ मुस्तफा यांना या संशोधनासाठी डॉ रवीकुमार थिमप्पा आणि झहीद मन्सूर भट यांनी सहाय्य केले.

* इंधन बाहेर टाकणारा इंधनघट [फ्युएल एकसलींग फ्युएल सेल] असे या संशोधनाचे नाव आहे. त्यात ऍनोड हा अल्कली, तर कॅथोड द्रवणात काम करतो. तोच हायड्रोजन द्रावणात इलेक्ट्रिक दाता म्हणून अल्कली द्रावणात काम करतो. तोच हायड्रोजन आम्ल द्रावणात इलेक्ट्रॉन संग्राहक म्हणूनही काम करतो.

* या हायड्रोजनचे रूपांतर ऍनोडजवळ अल्कली द्रावणात पाण्यामध्ये होते. तर आम्ल द्रावणात कॅथोडजवळ हायड्रोनियम आयन कमी होऊन हायड्रोजनची निर्मिती होते. आम्ल व अल्कली यांच्यातील ऊर्जा ही अभिक्रियेसाठी वापरली जाते. 

* पर्यावरण जतन आणि संवर्धनासाठी हायड्रोजन हा उत्तम पर्याय ठरणार आहे. अद्याप हायड्रोजनच्या निर्मितीच्या खर्च प्रचंड आहे. मात्र संशोधनद्वारे तो कमी करता येऊ शकतो.

* इंधनघटामध्ये आम्लाच्या जागी संत्र्याचा रस आणि अल्कलीच्या जागी गोमूत्र वापरूनही हा प्रयोग यशस्वी झाला. पेट्रोल-डिझेलला सक्षम पर्याय ठरणारे हायड्रोजनच्या इंधन म्हणून वापराचे तंत्रज्ञान पुढील पाच वर्षात उपलब्द होऊ शकेल. असे मुहम्मद मुस्तफा, शास्त्रज्ञ यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.