मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

देशातील अपघातामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर - १४ ऑगस्ट २०१८

देशातील अपघातामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर - १४ ऑगस्ट २०१८

* देशातील एकूण अपघातांच्या संख्येत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. राज्याच्या सध्याच्या घडीला मार्च महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील वाहनांची संख्या तीन कोटी २८ लाखाच्या घरात आहे. तर लायसन्स धारकांची संख्या ३ कोटी ४० लाख एवढी आहे.

* महत्वाचे म्हणजे अपघातामध्ये २५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठी आहे. अशी माहिती राज्य रस्ते सुरक्षा परिषदेतून उपलब्द झाली आहे. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकरराव रावते यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.

* राज्यात एकूण ३,०३,३५९ किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी १२,२७५ किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग, तर ३,८६१ किमी लांबीचे राज्य महामार्ग आहेत. देशपातळीवर अपघाती मृत्यूमध्ये राज्याचा तिसरा क्रमांक लागतो.

* काही महत्वाचे मुद्दे

* राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणे - १,३२४
* जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ - ३५,८५३
* रस्ते अपघातातील जखमीचे प्रमाण - ५४%
* अपघातातील मृत्यूमुखीचे प्रमाण - २९%
* रस्ते अपघातातील मृतांची संख्या - १२,२६४
* रस्ते अपघातातील गंभीर जखमींची संख्या - ३२,१२८
* २०१६ च्या तुलनेत २०१७ वर्षात घट
* अपघाती मृत्यूतील घट - ४.८० टक्क्यांनी घट
* २०१७ मध्ये देशातील अपघातांची संख्या सुमारे ३६ हजार
* राज्याबाहेर दुचाकी स्वार हेल्मेटचा कमी वापर

* अपघातासाठी ८०% मानवी चुका कारणीभूत असल्याचेदेखील निदर्शनात आले आहे. वेगाने गाड्या चालविणे, नियमांचे पालन ने करणे, लेन कटिंग, सिग्नल तोडणे, वाहनांची देखभाल न घेणे, मद्यधुंद स्थितीत वाहन चालविणे आदींचा समावेश यामध्ये आहे.

* अपघातांची संख्या कमी झाली, तरीही अपघाती मृत्यूपैकी २९ टक्के गंभीर जखमींपैकी २४% झाले आहेत. पादचारी, सायकलस्वार, दुचाकी वाहन चालकांची संख्या सर्वाधीक म्हणजे ६६% आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.