मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

स्पाईसजेट जैवइंधनावर धावणारे देशातील पहिले विमान - २८ ऑगस्ट २०१८

स्पाईसजेट जैवइंधनावर धावणारे देशातील पहिले विमान - २८ ऑगस्ट २०१८

* स्वच्छ आणि शाश्वत उर्जेला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत जैवइंधनावर विमान उडवण्याची महत्वाची कामगिरी आज भारताच्या नावावर जमा झाली.

* जैवइंधनाचा वापर करत एका खासगी कंपनीच्या विमानाने डेहराडून ते दिल्ली अशी विमानभरारी घेतली. त्यामुळे जैवइंधनाचा हवाई क्षेत्रात वापर करण्यात यशस्वी ठरलेल्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.

* हे विमान डेहराडून ते दिल्ली असा मार्ग असून डेहराडूनच्या विमानतळावरून स्पाईस जेट या खासगी कंपनीच्या विमानाने २३ प्रवासी आणि पाच कर्मचाऱ्यांना घेऊन दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले.

* या विमानाच्या एका इंजिनमध्ये जैवइंधनाचा वापर करण्यात आला आहे. डेहराडून स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेने विमानात वापरण्यात आलेल्या जैवइंधनाची निर्मिती केली.

* जैइंधनाचा यशस्वी प्रयोग केलेले देश - अमेरिका, कॅनडा, ब्राझील, चिली, मेक्सिको, जर्मनी, फ्रांस, ब्रिटन, स्पेन, फिनलँड, नेदरलँड, कतार, युएई, दक्षिण आफ्रिका, चीन, जपान, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.