बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

वॉरेन बफेची पेटीएममध्ये २५०० कोटीची गुंतवणूक - २९ ऑगस्ट २०१८

वॉरेन बफेची पेटीएममध्ये २५०० कोटीची गुंतवणूक - २९ ऑगस्ट २०१८

* जगविख्यात गुंतवणूक तज्ञ आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहात स्थान असलेले वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीने पेटीम या भारतीय कंपनीमध्ये २५०० कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

* वॉरेन बफे यांच्या कंपनीची भारतीय स्टार्टअपमध्ये करण्यात आलेली ही पहिलीच गुंतवणूक आहे. या व्यवहारात वॉरेन बफे हे प्रत्यक्ष सहभागी नव्हते तर त्यांचे सहकारी डेबी बॉनेस्क यांनी या व्यवहाराच्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण केल्या आहेत.

* बर्कशायर कंपनी पेटीएममध्ये ३ ते ४ % भागीदारी खरेदी करण्यासाठी चर्चा करत होती. पण सध्या तरी केवळ २५०० कोटी रुपये गुंतवणुकीने सुरवात करण्यात आली आहे.

* बफे यांनी याआधी केलेल्या गुंतवणुकीत ग्राहकोपयोगी वस्तू विकणाऱ्या कंपन्या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आणि विमा क्षेत्र या क्षेत्रासंबंधी कंपन्यांमध्येच गुंतवणूक केली आहे.

* पेटीएमच्या माध्यमातून पहिल्यांदाच वेगळ्या क्षेत्रात गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे.  बर्कशायर कंपनीकडे सध्या १०८.६ अब्ज डॉलर इतकी प्रचंड रोख आहे. त्यापैकी केवळ अर्धा अब्ज डॉलरपेक्षा किंचित अधिक रोख कंपनीने पेटीएममध्ये गुंतवली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.